नमस्कार मित्रांनो,
अनेक लोकांच्या घरापुढे जास्वंदचे झाड असतात. वास्तुशास्त्रानुसार घरापुढे जास्वंदीचे झाड असणं शुभ आहे की अशुभ आहे. आणि जास्वंद लावायचं असेल तर त्यासाठीची शुभ दिशा कोणती या सं-बंधी आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. सोबतच जास्वंदीच्या फुलांचा अतिशय प्रभावशाली टोटका सुद्धा पहाणार आहोत.
जो टोटका केल्यास आपल्या जीवनात धन कमी पडत नाही आणि आपल्या घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. जास्वंदीचे फुल हे जोतिष शास्त्रानुसार सूर्य आणि मंगळ यांच्या शी सं-बंधित आहे. तुमच्या अंगणात किंवा घरात जस्वानंदीचे झाड लावताना त्या झाडावर सूर्याचा पुरेसा सूर्यप्रकाश पडेल याची काळजी मात्र नक्की घ्या.
जी व्यक्ती जस्वनंदीचे फुल तांब्याभर पाण्यात टाकून हे पाणी सूर्याला अर्ग म्हणून दररोज अर्पण करते त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाही. त्या व्यक्तीचे हाडे मजबूत राहतात व त्या व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळते.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीतील मंगळ दोष दूर करण्यासाठी किंवा संपत्तीच्या बाधा दूर करण्यासाठी किंवा जमीन जुमल्याचे वाद विवाद चालू असतील तर हे दूर करण्यासाठी आपण जास्वंदीचे फुल हनुमानाला नक्की अर्पण करा. तसेच दुर्गा मातेस सुद्धा हे जास्वंदीचे फुल अति प्रिय आहे आणि म्हणून जास्वंदीचे फुल मंगळवारी माता दुर्गा किंवा हनुमानाला अर्पण केल्यास अनेक प्रकारच्या ग्रह पीडा शांत होतात.
तसेच ज्यांना धन, वैभव, पैसा हवा आहे त्यांनी शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीच्या चरणी हे जास्वंदीचे फुल नक्की अर्पण करावं. तर रविवारच्या दिवशी आपण हा टोटका करायचा आहे रविवारच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा. आणि त्यांना 8 लाल जास्वंदीची फुले त्यांना अर्पण करा.
आणि दुसरी दिवशी सोमवारी गणपती बाप्पांना अर्पण केलेली जास्वंदीची ही 8 फले घेऊन सूर्यप्रकाशामध्ये तासाभरासाठी ठेवा त्यानंतर 4 ते 5 दिवस त्या फुलांना सावलीमध्ये सुखवा आणि त्या फुलांची बारीक पावडर बनवा. पावडर बनवताना त्यात थोडासा कापूर आणि सिंदूर नक्की टाका.
यानंतर ज्या-ज्या वेळी तुम्ही महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडला त्यावेळी या पावडरचा टिळा आपण लावत चला. यामुळे तुम्ही जे काम करण्यासाठी बाहेर पडाल ती कामे नक्की पूर्ण होतील. हे जास्वंदीचे झाड नक्की कुठे लावावं? वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या घरात कुठेही अगदी कोणत्याही दिशेला हे जास्वंदीचे झाड लावू शकता. मात्र त्यावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल याची काळजी नक्की घ्या.