Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

घरात सतत आजारपण, संकटे, अडचणी येत असतील तर किचनमध्ये 1 उपाय आजच करून पहा..

नमस्कार मित्रांनो,

आयुष्य म्हटलं की संकटे, अडचणी येतातच. प्रत्येक मनुष्याला संकटाचा सामना करावा लागतो. अशावेळी खचून न जाता या संकटांचा सामना करावा, अडचणी वर मात करावी. परंतु कधीकधी असे घडते की संकटे संपण्याचा नावच घेत नाहीत. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीचे आजारपण बरे होतात दुसरी व्यक्ती आजारी पडते, अशातच एखाद्याचा अपघात होतो अशाप्रकारे चारही बाजूंनी वेढले गेल्यासारखी आपली अवस्था होते.

अशावेळी आपल्याला वाटते की कोणीतरी आपल्या घरावर बाधा उत्पन्न केली आहे किंवा कुठल्यातरी देवी देवतांचा कोप झाला आहे. हे असे विचार मनात येणे सहाजिक आहे. अशावेळी ज्योतिष शास्त्र आपल्या कामी येऊ शकते. एकापाठोपाठ एक येणाऱ्या संकटांचा अंत कसा करावा हे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले आहे. यातीलच एक उपाय आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो या तीन ग्रहांना जर आपण शांत करू शकलो तर आपल्यावर येणारी संकटे बऱ्याच प्रमाणात आपण कमी करू शकतो शिवाय या समस्यांची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होते. हा उपाय शुक्र, राहू आणि केतू या तीन ग्रहांना शांत करणारा आहे. बऱ्याच लोकांचा या गोष्टींवर विश्वास नाही परंतु जर तुम्ही संकटात असाल तर एकदा करून पहा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल.

आपण आज जो उपाय पाहणार आहोत तो उपाय घरामध्ये जी गृहलक्ष्मी आहे तिने करायचा आहे. चपातीसाठी कणिक मळत असताना पहिली चपाती गोमातेच्या नावाने बनवायची आहे म्हणजेच गोमातेसाठी बनवायची आहे, दुसरी चपाती कावळ्यासाठी, तर तिसरी चपाती कुत्र्यासाठी बनवायची आहे.

गाय, कुत्रा आणि कावळा हे जे तीन प्राणी आहेत ते शुक्र, राहु, केतू यांचे प्रतीक आहेत. चपाती केल्यानंतर तुमच्या आसपास गाय असल्यास तिला खाऊ घाला, दुसरी चपाती दह्यामध्ये मिक्स करून घराच्या छतावर कावळ्यासाठी ठेवा, तिसरी चपाती कुत्र्याला खाऊ घाला.

प्रत्येकाच्या घरा जवळ आसपास गाय असतेच असे नाही त्यामुळे हा उपाय दररोज करणे शक्य होत नाही अशावेळी तुम्ही आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी हा उपाय करू शकता. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तुमच्या जवळपासच्या गोशाळेमध्ये जाऊन गाईची सेवा करू शकता गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा सहवास असतो त्यामुळे आपल्यावर जे संकट आलेले आहे ते दूर होण्यास मदत होते.

जो व्यक्ती आजारी आहे त्याने गाईवर प्रेम भावाने हात फिरवून मनोभावे तिची सेवा केली, तिची प्रार्थना केली तर सर्व आजारपणातून मुक्ती मिळेल. कावळ्यांचेही तसेच आहे का जर तुम्ही शहरात राहत असाल तर कावळे तुम्हाला सहसा दिसणार नाहीत अशा ठिकाणी कावळे ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कावळ्यांना हे अन्न खायला देऊ शकता.

या तीन ग्रहांना शांत करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा याचा चांगला परिणाम झालेला तुम्हाला दिसून येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घराला किंवा घरातील व्यक्तींना बाहेरही व्यक्तींची नजर लागू नये याची काळजी घ्या कारण बरेचसे दोष किंवा घटना या बाहेरील लोकांच्या नजर लागल्यामुळे उद्भवत असतात.