नमस्कार मित्रांनो..
ल’ग्न असो किंवा सत्यनारायण पूजा असो किंवा होम हवन असो किंवा कोणतीही पूजा असो, कोणतेही शुभ कार्य असेल, तर त्या ठिकाणी गणपतीच स्वरूप म्हणून सुपारी ठेवली जाते. कारण असे म्हटले जाते कि, सुपारीमध्ये श्रीगणेशाचा वास असतो. आणि म्हणून पूजेमध्ये या सुपारीची पूजा देखील केली जाते. तर आज आपण याच सुपारीचा उपाय पाहणार आहोत. जे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो, तुम्हाला भाग्याची साथ मिळवून देतो.
हा सुपारीचा उपाय आपल्याला सात दिवस सलग करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. हा उपाय तुम्हाला तुमच्या मनात सकारात्मक भावना ठेवूनच हा उपाय करायचा आहे. हा उपाय खूप सोपा असून, परंतु त्यांचा परिणाम खूपच चांगला आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी घ्यायची आहे. आपण खाण्यासाठी वापरत असलेली सुपारी, हि पूजेत वापरल्या जाणाऱ्या सुपारीपेक्षा वेगळी असते.
आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेत वापरली जाणारी सुपारी घ्यायची आहे. या उपाय करण्यासाठी आपल्याला नवी सुपारी घ्यायची आहे म्हणजे आधी पूजेत वापरलेली सुपारी पुन्हा तीच वापरू नका. आपल्याला हा उपाय गुरुवारपासून सुरू करायचा आहे, पण गुरुवार दिवशीच्या आधीच आपल्याला घरात सुपारी आणायची आहे. पण हा उपाय आपल्याला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे.
गुरुवारी सुपारीला दुधाने आणि नंतर पाण्याने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर ही सुपारी आपल्या देवघरात पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे. हा उपाय तुम्ही गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता. आता पुढील सात दिवस हळद-कुंकू अगरबत्ती दाखवून या सुपारीची पूजा करायची आहे. ही सुपारी साक्षात श्री गणेश आहेत, या भावनेने आपल्याला पूजा करायची आहे.
सात दिवस झाल्यानंतर आपल्याला आठव्या दिवशी ही सुपारी आपल्या तिजोरीत कायमस्वरूपी ठेवायची आहे. जिथे आपण आपली मौल्यवान वस्तू, दागिने, पैसा ठेवतो. त्याठिकाणी ठेवायची आहे. जर तुमचे दुकान असेल, तर तुम्ही दुकानाच्या गल्ल्यातही सुपारी ठेवू शकता. तुम्ही कितीही मेहनत केली, तरी जोपर्यंत नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत कार्यात यश मिळत नाही. पण हा उपाय केल्यावर,
तुम्हाला नशीबाची साथ मिळेल. ही सुपारी साक्षात श्री गणेशाची आहे आणि जिथे श्री गणेशाचा वास असतो. तिथे प्रत्येक कामात यश मिळते. जर तुम्हाला कोणत्याही कामात अडचण, सम’स्या येत असेल, काम पूर्ण झाले नाही, असे वाटत असेल, कामात काही काळ अडथळे येत असतील किंवा अपयश येत असेल, तर हा उपाय अवश्य करा. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील. तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल.
आणि भगवान गणपती तुमची सर्व कार्ये सुरळीतपणे पूर्ण करतील. टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद.