Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

दोडक्याची भाजी खाणार्‍यांनो एकदा हे वाचा…बघा यामुळे शरीरात काय काय घडते..महत्वाची माहिती

नमस्कार मित्रांनो,

दोडक्याची भाजी म्हटली की, आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. दोडका ही भाजी खरंतर भारतात सर्वत्र मुबलक प्रमाणात आढळते. पण ही भाजी मुळची सपक चवीची असल्यामुळे ती फारशी लोकप्रिय नाही. चव वाढवण्याकरता बरेचसे मसाले वापरून ही भाजी केली जाते.

परंतु चवदार नसली तरी ही भाजी वजन कमी करायला, डोळ्यांचं आरोग्य सुधारायला आणि रो’गप्रतिकारशक्ती वाढवायला खूप उपयोगी पडते. दोडक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, विटामीन ए, विटामीन सी, आयर्न, मॅग्नीशियम, विटामीन बी 6 आणि पाणी मोठ्या प्रमाणात असते. दोडक्यामध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात तसेच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील अतिशय कमी असते.

भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असणारे दोडके पचनास हलके आणि भरपूर पोषण देणारे असते. तसेच दोडक्याची भाजी मधुमेहींसाठी खूप फायदेशीर मानली जाते. कारण ही दोडक्याची भाजी इन्सुलिन नियंत्रित करते. त्यात रक्तातील साखरेच्या पातळीत पेप्टाइड्स आणि अल्का लाइट असतात, जे दोडक्याची भाजी अनुकूल बनवत असते.

दोडका याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत करते. तसेच ही भाजी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. ही भाजी पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करण्यासाठी दोडक्याची भाजीचे नक्कीच सेवन केले पाहिजे.

जर तुम्हाला पोटाच्या संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही दोडक्याची भाजी खावी. तसेच यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. जर तुम्हाला आपले वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी आहारात दोडक्याच्या भाजीचा अवश्य समावेश करा. वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

वास्तविक, यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि जास्त प्रमाणात फायबर तुम्हाला खूप वेळ पोट भरून ठेवते, त्यामुळे भूक कमी लागते आणि तुम्ही अनावश्यकपणे कॅलरीज वापरण्यापासून वाचवते. याशिवाय दोडक्यामुळे कॅलरी आणि फॅटही वाढत नाही. याचबरोबर, कावीळ झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये दोडक्याचा २-३ थेंब रस टाकल्यास नाकातून पिवळा द्रव पदार्थ बाहेर पडतो.

या उपायाने कावीळ लवकर समाप्त होतो असे सांगितले जाते. याशिवाय अर्धा किलो दोडके बारीक कापून 2 लिटर पाण्यामध्ये उकळून घ्या. मग त्यानंतर पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये वांगे शिजवून घ्या. वांगे शिजल्यानंतर तुपामध्ये परतून घ्या आणि गुळासोबत सेवन करा. हा उपाय केल्यास मुळव्याधीचा त्रास कमी होईल.तसेच दोडक्याचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायक आहे. दोडका रक्त शुद्धीकरणासाठी खूप उपयोगी आहे.

तसेच दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात बिटा कॅरेटीन आणि विटामीन ए असल्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दोडका अतिशय गुणकारी आहे. उतारवयात होणारा दृष्टिदोष होऊ नये म्हणून आधीपासून नियमितपणे दोडका आहारात असावा.

याचबरोबर ऍनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता ह्यावर गुणकारी मानला जातो. दोडक्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असल्यामुळे दोडका हा ऍनिमियावर अत्यंत गुणकारी आहे. तसेच दोडक्यामध्ये विटामीन बी-6 असल्यामुळे शरीरातील तांबड्या रक्त पेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यन्त रक्तपुरवठा होण्यास खूप मदत होते.

याशिवाय यातील सेल्युलोज हा एक फायबरचा प्रकार आहे ज्यामुळे पचनास मदत होते. म्हणून दोडक्याची भाजी अथवा दोडका घालून केलेली आमटी नेहेमी आहारात ठेवली की पचनाच्या समस्या कमी होतात. कॉ’न’स्टी’पे’श’न होत नाही. दोडक्याचा रस चमचाभर मध घालून खाल्यास अपचनाच्या समस्येवर त्वरित आराम मिळतो.

तसेच यकृत म्हणजेच लिवरचे कार्य सुधारण्यास मदत होते. कारण दोडक्यामध्ये रक्तशुद्धीचे गुणधर्म देखील आहेत. टॉ’क्सि’न्स्, ऑक्सिडंट्स, अ-ल्कोहोल, न पचलेले अन्न ह्यामुळे श’रीरात निर्माण होणारी अशुद्धी दूर करून रक्त शुद्ध करण्यासाठी दोडक्याचे नियमित सेवन मोठा हातभार लावू शकते. त्यामुळे लिवरचे कार्य सुधारते तसेच शरीरात होणारा पित्तरसाचा स्त्रा’व नियंत्रणात राहतो. ह्या गुणधर्मामुळे दोडका काविळीवर अत्यंत गुणकारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *