नमस्कार मित्रांनो,
दीप आमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या आहे. या वर्षी या आमावस्याची सुरुवात 27 जुलै रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी होत असून या अमावास्याची समाप्ती 28 जुलै 11 वाजून 24 मिनिटांनी होईल. थोडक्यात दीप आमावस्या 28 जुलै या दिवशी साजरी करत आहोत. दिव्याची जोत हे मांगल्याचे प्रतीक,
अग्नित्वाचे प्रतीक आहे अग्निप्रतिक कृतज्ञात करण्यासाठीच आषाढ आमावस्याला आपण दीप पूजन करतो. पितृच्या स्मरणार्थ या दिवशी पिंपळ, वटवृक्ष, केळी आणि तुळशीच्या रोपांची लागवड ही उत्तम मानली जाते. दीप अमावस्या दिवशी रोप लागवड केल्याने पूर्वज समाधानी बनतात. तसेच या दिवशी एकमेकांना भेट वस्तू म्हणून रोपटे देणं हर सुद्धा शुभ मानलेलं आहे.
या दीप आमावस्या नंतर श्रावण महिन्यास सुरुवात होते. भरपूर पाऊस आणि अंधारून येणं हे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्य आणि म्हणूनच घरात इकडे तिकडे ठेवलेले व धुळीने माखलेले समया निरांजने यांना एकत्र करून घासून पुसून ठेवण्याचा हा दिवस आहे.
या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत व पाटाभोहती सुरेख रांगोळी काढावी या सर्व दिव्यामध्ये तेल वात घालून दिवा प्रज्वलित करावा. या सर्व दिव्यांना हळद-कुंकू लावून फुले वाहून मनोभावे पूजा करावी गोड नैवेद्य दाखवावं. हे सर्व करत असताना या मंत्राचा जप आपण नक्की करा.
मंत्र असा आहे “दीप सूर्याग्निरूपस्तं तेज तेजम गृहामान मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भवः” याचा अर्थ असा होतो की हे दीप तू सुर्यरुप आणि अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्विकार कर आणि माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण कर.
घरातील पीडा टळून अज्ञात रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करावे अशी आपली संस्कृती सांगते. या दीप अमावस्या दिवशी अनेक लोक पितृ तर्पण सुद्धा करतात आपल्या पितृना पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. अमावस्याला हा विधी केल्याने पितृना मुक्ती मिळते आणि ते पूढील पिढ्यान शुभ आशीर्वाद देतात असं मानलं जातं.
शास्त्र आणि पुराणानुसार दीप अमावस्याला उपवास केल्याने त्याचा परिणाम हे अनेक पटीने मिळते. तर आपण सुद्धा या दीप आमावस्येस आशा प्रकारे दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा नक्की करा.