नमस्कार मित्रांनो,
हिंदू ध र्म शास्त्रानुसार आपल्या देवघरात 1 तांब्या जल नक्की असावे. 24 तास आपल्या देवघरात पाणी असायला. हवं एखाद्या कलश मध्ये किंवा तांब्यामध्ये हे पाणी आपण नक्की ठेवा. यामुळे आपल्या घरात शांती नांदते व आशा घरातील लोकांना सुख-समृद्धी प्राप्त होते.
तसेच आशा घरातील मूर्ती कधीच खंडित होत नाहीत. अनेक लोकांच्या घरात अशी समस्या असते की देवी देवतांच्या मूर्ती तडकतात आणि यामुळे अपशकुन घडून येतो. म्हणून आपल्या देवघरात 1 तांब्या जल नक्की असावं. तांब्याच्या पात्रामध्ये, चांदीच्या पात्रामध्ये आपण हे जल ठेऊ शकता.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच जेंव्हा तुम्ही देवपूजा करणार असाल तेंव्हा आदल्या दिवशी ठेवलेलं पाणी हे आपण एखाद्या झाडाच्या ओतून द्या किंवा जवळपास सरोवर असेल नदी असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण हे जल समर्पित करून शकता. आणि नवीन पाणी त्या तांब्यामध्ये भरून देवघरात ठेवा.
यामुळे कुटुंबात सुख समाधान नांदू लागतं. अनेकजण देवघरातील दिवा भुंकर मारून विजवण्याची चुक करतात आशा प्रकारे कोणताही दिवा, पंच आरती कतापी विजवू नये. कारण हा अग्निदेवतेचा आपमान मानला जातो. यामुळे अग्नी देवतेची पवित्रता खंडित होते म्हणून आपण ही चूक करू नका.
अगरबत्ती पे-टवल्यावर सुद्धा ती फुंकर न मारता विजवावी. आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर दोन्ही चौकटीवर शुभ-लाभ हे नक्की लिहा. किंवा आपण स्वस्तिक सुद्धा काढू शकता. यामुळे कुटुंबात मंगल वातावरण निर्माण होत आणि सर्व मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडतात.
प्रत्येक वेळी घरात येताना घरातील लोकांनी या स्वस्तिकचे दर्शन घेऊन जर घरात प्रवेश केलात तर घरात आनंद व उत्साह, चैतन्य, सुख, समाधान या सर्व गोष्टी आपोआप निर्माण होतात.