नमस्कार मित्रांनो,
आज आपण माहिती घेणार आहोत. घरामध्ये कलश कसा ठेवावा आणि कुठे ठेवावा. ठेवणे योग्य आहे की अयोग्य आहे तर अनेक ठिकाणी आपण असं पाहत असतो की? देवघराच्या ठिकाणी तिथे जवळ कलश ठेवला जातो. त्याला कलश असे म्हणतात कळस नाही.
मग कलश ठेवणे योग्य आहे का? तर शास्त्रामध्ये सुध्दा त्याला मान्यता आहे. काही ठिकाणी देवघरामध्ये कलश ठेवला जातो. ते कुलदेवतेच्या नावाने तर काही ठिकाणी अनेक लोक ठेवत असतात. म्हणून कलश आपल्या घरामध्ये ठेवला तरी चालेल आणि त्याला शास्त्रात मान्यता आहे.
ज्या माणसाच्या देवघरासमोर कलश ठेवलेला असेल त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट येत नसतात. आणि त्या घरात कुलदेवतेचा नेहमी आशीर्वाद असतो. पण आपल्या घरामध्ये पूर्वी पासून परंपरा असेल तर आवश्य कलश ठेवा.
पण काही लोकांच्या घरामध्ये पूर्वीपासून पंरपरा नाही, अशा वेळेला नाही ठेवलं तरी चालेल. मग कलश ठेवत असताना कसा ठेवावा. त्याबद्दल माहीत आहे का? आपण याबद्दल जाणून घेऊया! आपल्या देवघरामध्ये कलश ठेवत असताना शक्यतो मंगळवारी किंवा शुक्रवारी अशा या दिवशी ठेवा.
देवीचा वार ज्या दिवशी असेल त्या दिवशी कलश मांडा. तर कलश ठेवत असताना कसा ठेवावा? काय काय सामान लागतं? त्यासाठी नारळ विड्याची पाने आणि कलश लागतो त्या कलशामध्ये पाणी, पाणी जर नसेल कलशामध्ये तर घरामध्ये संकट येत असतात.
म्हणून कलशामध्ये पाणी आणि सुपारी एक रुपयाचा नाण, हळद, कुंकू अक्षदा आणि एखाद फुल टाकलेलं असावं. आणि देव घरामध्ये ठेवायचा असेल तर कसा ठेवावा? देव घरामध्ये कलश ठेवत असाल तर कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलश मांडावा, आधी तांदूळ ठेवावे आणि त्या तांदळावर कलशाची स्थापना करावी.
आणि त्या कलशावर नारळ ठेवावा. फक्त कलशावर नारळ ठेवत असताना एका गोष्टीची काळजी घ्यावी. नारळाचं तोंड वरच्या दिशेने आणि नारळाचा खालचा भाग कलशामध्ये असावा. अशा पद्धतीने कलशावर नारळ ठेवावा. कुलदेवतेच्या डाव्या बाजूला कलश यांची स्थापना करून नंतर कलशाच्या चारीही बाजूला गंधाच्या रेषा ओढव्यात.
पाच प्रकारे ओढा. पाचपट्टे आपण का ओढतो. चार पट्टे म्हणजे चारवेद आणि पाचवा पट्टा वरुण देवता म्हणून पाच पट्टे ओढण्याची प्रथा आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे. पण मात्र नारळाला एखादा दोरा अवश्य गुंडाळा आणि कलशाला एखादा दोरा अवश्य गुंडाळा. कलशावर स्वस्तिक काढलं तरी चालेल. बिना सोललेला नारळ कलशावर ठेवला पाहिजे. सोललेला नारळ कधीही कलशावर ठेवू नये.
ज्या वेळेला आपण त्यांच्यावरचा नारळ बदलत असतो त्या वेळेला अमावस्येला नारळ बदलायचा! नवीन ठेवायचा आणि तो देवासमोर फोडायचा. अशा पद्धतीने जर आपण देवाच्या समोर नारळ फोडला. तर घरामध्ये सुख संपत्ती धनधान्य लक्ष्मी ही अखंडवास करत असते. आपल्या मुलांना आयु आरोग्य प्राप्त होत असतं म्हणून आपल्या घरामध्ये कलश अवश्य ठेवा आणि कलशाची सांगितल्याप्रमाणे पूजा करा. पहा आपल्या घरामध्ये कशी बरकत येते.