हे 7 संकेत सांगतात की देव दररोज तुमच्या घरी येतात…असे लक्षणे दिसले तर समजून जा लवकरच श्रीमंत होणार

नमस्कार मित्रांनो,

आपल्या सर्वांची कोणत्या ना कोणत्या देवतेवर श्रद्धा असते. आपण त्या देवतेची दररोज मनोभावे पूजा करतो साधना करतो. आणि कधी कधी ही साधना फलास येते आणि देवता आपल्या घरात वास्तव्य करू लागतात. देवता जेव्हा आपल्या वास्तुमध्ये वास करू लागते तेव्हा हा वास अदृश्य स्वरूपात असतो. मात्र या देवते कडून काही संकेत आपल्याला प्राप्त होतात असे 7 संकेत आज आपण जाणून घेणार आहोत.

जर तुम्हाला पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर शरीरामध्ये कंपन जाणवत असेल शरीर सुक्ष्म रित्या थरथरत असेल. तर हा सर्वात मोठा संकेत आहे की आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास निर्माण झालेला आहे. आणि त्यांच्या कृपेने सर्व काही शुभ व मंगल होणार आहे. आशा प्रकारची कंपन सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा जाणतात.

जर या दोन वेळेला तुमच्या शरीरात कंपन जाणवत असतील तर हा सर्वात मोठा संकेत आहे देवी देवतांच्या वास्तव्याचा. अनेकदा आपल्याला भविष्यात घटणाऱ्या घटनांकची जाणीव होते की आता ही गोष्ट नक्की घडणारच आहे. अनेक जणांना असा अंदाज येतो आणि हा अंदाज खरा सुद्धा ठरतो. जर तुम्हाला ही भविष्यातील घटनांचा अंदाज तुम्ही सांगू शकत असाल. तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांच्या कृपेने तुम्हाला ही एक दैवीय शक्ती प्रदान केलेली आहे.

अजून एक फार मोठा संकेत आपल्या घरावर कितीही मोठं संकट हेऊ द्या. आशा संकट समयी तुमची तुमच्या देवतेवरची श्रद्धा, विश्वास कमी होत नसेल. तर हा सुद्धा एक खुप मोठा संकेत आहे की ही बुद्धी तुम्हाला त्या देवांनी दिलेली आहे. आपल्या घरात वादविवाद,भांडने असतील आणि ही भांडणे, वादविवाद संपून प्रेम वाढीस लागलेलं असेल.

तर हा सुद्धा संकेत असतो की देवी देवता आपल्या घरात वास करत आहेत. अनेक जणांना स्वप्नामध्ये लहान एक छोटीशी सुंदर मुलगी जणू साक्षात महालक्ष्मीचे रूप असल्या प्रमाणे दिसते. तुमच्या स्वप्नात आशा छोट्याशा मुलीचे वारंवार दर्शन होत असेल. तर हा सुद्धा संकेत आहे की देवी देवतांची कृपा तुमच्या वर होत आहे.

आपल्या घरामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा सुगंध निर्माण होणे. फुले नाहीत किंवा फुले आहेत मात्र ती तितके सुगंधी नाहीत. मात्र तुम्हाला मनमोहक मनाला मोहून टाकणारा सुगंध जाणवत असेल. तर हा देखील संकेत असतो देवी देवतांच्या आपल्या घरातील वास्तव्याचा.

शेवटचा संकेत तो म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामध्ये घरातील गृहिणी जे काही बनवेल ते स्वादिष्ट, चवदार बनत असेल. तर आपल्यावर माता अन्नपूर्णा प्रसन्न आहे हे समजून जा आणि घरात देवी देवतांचा वास नक्की आहे असे जाणून घ्या. हे आहेत ते 7 संकेत ज्यांच्या द्वारे आपण समजू शकतो की देवी देवतांचा वास आपल्या घरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *