Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

नवीन वर्षाच्या नवीन कॅलेंडर वर लिहा हा नंबर…वर्षभर पैसा कमी पडणार नाही..

भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी अनेक ग्रंथांची रचना केली. मानवी जीवनाच कल्याण व्हावं हा त्या पाठीमागील उद्देश होता. या ग्रंथांपैकी एक ग्रंथ म्हणजे भारतीय अंकशास्त्र. अर्थात इंडियन न्युमरोलॉजी. या ग्रंथामध्ये अंकांचा मानवी जीवनावर कशाप्रकारे प्रभाव पडतो? याबाबत सविस्तर विवेचन केलेला आहे. प्रत्येक अंकाचा मानवी जीवनावर मानवी भाग्यावर कमी जास्त प्रमाणात प्रभाव पडतोच. हे या ग्रंथामध्ये नमुद केलेल आहे.

मित्रांनो आज आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने खरेदी केलेल्या नवीन कॅलेंडर वर कोणते अंक लिहावेत? कोणता नंबर लिहावा? जेणेकरून आपल्याला भाग्याची साथ मिळेल, नशीब आपल्याला साथ देऊ लागेल, या बाबत माहिती घेणार आहोत. आपण नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन कॅलेंडर नवीन दिनदर्शिकेची खरेदी करतो. मित्रांनो अजून नवीन खरेदी केलेलं कॅलेंडर हे आपला येणारा काळ दर्शवत असत आणि म्हणून ही वस्तू आपल्या भाग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे.

या कॅलेंडर वरती आपण तीन अंक लिहायचे आहेत. तीन अंकांचा समुच्चय करून जो एक नंबर बनणार आहे, हा नंबर हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवणारा असेल. मित्रांनो नविन वर्षाच कॅलेंडर खरेदी केल्यानंतर आपण प्रत्येक पानावरती कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर ती हा नंबर लिहायचा आहे. हा नंबर लिहिण्यासाठी आपण हळदीचा वापर करणार आहोत. एखाद्या पात्रामध्ये म्हणजेच वाटीमध्ये, प्लेट मधे आपण हळद घ्या.

त्या हळदीमध्ये पाणी टाकून त्या हळदीचा चांगला घोळ बनवा आणि त्यानंतर कोणतीही एखादी काडी घ्या शक्यतो देवघरा मध्ये आपण जी अगरबत्ती लावतो. त्या अगरबत्तीची काडी आपण वापरावी आणि त्या काडीच्या मदतीने किंवा अन्य साधनांच्या मदतीने आपल्या कॅलेंडर वरील प्रत्येक पानाच्या सर्वात टॉपमोस्ट भागावर म्हणजे सर्वात वरच्या भागावरती आपण हा नंबर लिहायचा आहे. हा नंबर आहे ५२०, अर्थात पाच दोन शून्य.

मित्रांनो या नंबरची निवड आपण यासाठी केलेली आहे, कारण पाच दोन आणि शून्य या तीनही अंकांची बेरीज सात येते आणि सात हा नंबर २०२३ या सालासाठी अत्यंत शुभ असणार आहे. २०२३ या सालामध्ये दोन शुन्य दोन तीन अशा प्रकारे जे अंक येतात, या सर्व अंकांची बेरीज सुद्धा सात येते. सोबतच ५२० हा नंबर भाग्य प्रबळ बनवणारा मानण्यात येतो. या नंबर मुळे आपलं भाग्य प्रबळ बनतं. लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त करून देण्यासाठी आपण हळदीचा वापर करतो आहोत.

मित्रांनो हा नंबर प्रत्येक पानावरती वरच्या भागावर लिहिल्यानंतर आपण दररोज नित्यनियमाने या नंबरकडे पहायच आहे आणि हा नंबर अधिकाधिक वेळ मनातल्या मनात बोलायचा आहे किंवा तुम्ही मोठ्याने सुद्धा या मंत्राचा जप करू शकता. पाच दोन शून्य, पाच दोन शून्य, अशा प्रकारे हा नंबर तुम्ही म्हणू शकता. मित्रांनो हा नंबर इतका प्रभावशाली आहे की तुमची पैशासं-बंधीची कामे अडणार नाहीत.

पैसा येनकेन प्रकारेण तुमच्याकडे येत राहील. तुमचं भाग्य, तुमचं नशिब तुम्हाला साथ देईल. मित्रांनो जर तुम्ही तुमची इच्छा तुमच्या मनामध्ये अनेक दिवसांपासुन अपूर्ण आहे, तर या इच्छेची पूर्तता करण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या कॅलेंडर वरती जर तुम्हाला अमुक अमुक तारखेला अमुक अमुक काम पूर्ण होणं गरजेचं वाटतं.

जसे की तुमचं घराचं स्वप्न आहे तर २०२३ या सालामध्ये एक उदाहरण म्हणून सोळा ऑगस्ट पर्यंत तुमचं घर पूर्ण व्हावं असं तुम्हाला वाटत तर त्या सोळा ऑगस्ट मधील सोळा या तारखेला तुम्ही लाल किंवा हिरव्या पेनाने गोल करा आणि त्या ठिकाणी त्याच पेनाने त्याच शाईने माझ्या घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे.

अशा प्रकारे तुमची इच्छा लिहा जणू काही ती इच्छा तुमची पूर्ण झालेली आहे. तुम्हाला दिसून येईल की जस जशी सोळा तारीख जवळ येईल. तुमचं घरासंबंधीच जे स्वप्न आहे ते खूप लवकर पूर्णत्वास जाईल. तुम्ही जे प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना नशिबाची साथ लागेल. इच्छापूर्तीचा हा एक अतिशय प्रभावशाली असा उपाय आपण करू शकता.

मित्रांनो हे कॅलेंडर फाटणार नाही, तुटणार नाही, इकडे तिकडे इतस्ततः पडणार नाही, खराब होणार नाही याची मात्र काळजी आपण नक्की घ्या आणि कॅलेंडर लावताना ते योग्य दिशेला लावावा जेणेकरून आपला हा उपाय नक्कीच कार्य करेल. धन्यवाद.