नमस्कार मित्रांनो,
जगात असे काही लोक आहेत ज्यांचे मन इतरांपेक्षा कितीतरी पटीने वेगवान होते. याला आपण IQ म्हणतो. बर्याचदा आपण पाहतो की काही लोकांना अत्यंत अवघड गोष्टी लगेच समजतात तर काहींना साध्या आणि सोप्या गोष्टी समजायला खूप वेळ लागतो. हे वेगवेगळ्या बुद्ध्यांक पातळीमुळे होते. आपल्यापैकी प्रत्येकजण जीवनाच्या कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात जास्त हुशार असतो.
जे लोक बुद्धिमान असतात त्यांची विचारसरणी गुंतागुंतीची असते आणि त्यांची मानसिकता समाजातील लोकांपेक्षा वेगळी असते. अनेक अभ्यासातून हे समोर आले आहे की बुद्धिमान लोक खूप कमी सामाजिक असतात. त्यांना राखीव राहायला आवडते. अशा प्रकारे हुशार आणि बुद्धिमान व्यक्तीची अशी 5 लक्षणे संशोधकांनी सांगितले आहेत, जी काही लोकांकडे त्यांनी पाहिली आहेत.
1- माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते की, शेवटच्या बेंचवर बसलेल्या व्यक्तीचे मन सर्वात कुशाग्र असते. जर तो हुशार नसेल, तर तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा आहे. कारण पहिल्या बाकावर बसलेला विद्यार्थी वर्गातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. जर तुम्ही विचार करत असाल की, जो वर्गाच्या मागच्या बाजूला बसेल तो कदाचित चांगले गुण मिळवू शकणार नाही. पण शेवटच्या बसलेल्या विद्यार्थ्याला आयुष्यातील प्रत्येक संकटाला कसे सामोरे जायचे हे माहीत असते.
2- जर तुम्ही नेहमी चिंतेत असाल, मेंदू त’णावाखाली अधिक सतर्क असतो. त’णाव-चिंतेमध्ये असलेले लोक अनेकदा निर्णय घेण्याच्या चांगल्या स्थितीत अधिक कार्यक्षम असतात. समस्यांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे काळजी करणे हे देखील हुशार असण्याचे लक्षण आहे.
3- जर तुमच्या मुलाला उजव्या हाताने लिहिता येत नसेल, तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, कारण ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. डाव्या हाताने लिहणारे लोक अधिक हुशार असण्याचे लक्षण आहेत. 90 च्या दशकाच्या सुरुवातीच्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, डाव्या हाताने लिहणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन वेगळा असतो. ती शैली वेगवेगळ्या गोष्टींना अर्थपूर्ण बनवते, असे मानले जाते की डावे हात म्हणजे सर्जनशील विचार, समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेला अर्थपूर्ण विचार करण्यासाठी उपयुक्त मानला जातो.
4- तुम्ही स्वतःमध्ये, असणाऱ्या परिस्थितीत आनंदी आहात ना? जो माणूस स्वतःमध्ये आनंदी असतो, याचबरोबर ज्यांना घरी पुस्तक आणि कॉफी घेऊन वेळ घालवायला आवडते, पुस्तके हे त्याचे सर्वात चांगले मित्र असतात, अशा लोकांची सर्वात चांगली गोष्ट आहे की ते स्वतःचा आनंद स्वतः शोधतात. कारण स्वतःमध्ये आनंदी राहिल्यास आणि लहानपणापासूनच पुस्तके वाचल्याने माणसाची बुद्धीमत्ता वाढते.
5. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नेहमी हसवत असाल किंवा तुम्ही नेहमी हसत असाल तर नक्कीच तुम्ही वेगळे हसमुख हुशार व्यक्ती आहात. जेव्हा कोणी त्यांची समस्या घेऊन तुमच्याकडे येतो, तेव्हा तुम्ही तुमच्या विनोदाने तुमच्या आजूबाजूच्या लोकांना हसवत राहता. त्यांना नॉर्मल बनवण्याचं काम करता, त्यांचा तणाव कमी करत असाल तर हे तुमच्या बुद्धिमत्तेचे चांगले लक्षण आहे. कारण 1990 मध्ये, डॉ. ए मायकल जॉन्सन यांनी एक अभ्यास प्रकाशित केला ज्यामध्ये हास्य आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा थेट सं-बंध आढळला.