Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

गजानन महाराजांच्या जीवनातील प्रसंग वाचून अंगावर कट येईल..बोला गण गण गणात बोते |

नमस्कार मित्रांनो आज आपण शेगावच्या गजानन महाराजांचा त्यांच्या जीवनातील घडलेला एक प्रसंग बघणार आहोत हा किस्सा वाचून तुमच्याही अंगावरती कट येईल.तर मित्रानो श्री गजानन महाराजांचा जन्म हा शेगाव मध्ये झाला होतो जन्मतः अष्टसिद्धी त्यांना प्राप्त झाली होती.तर महाराजांनी जीवदशेला आल्यावर सर्व मर्यादांचे पालन केले,तसेच अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थांसोबत राहिल्यानंतर गजानन महाराज हे नासिक पंचवटी साधना करू लागले.

तर मित्रांनो जेव्हा महाराज हि साधना करत होते तेव्हा त्यांच्या अलौकिक रामभक्तीचा प्रत्यय देणारी खूप मोठी घटना हि पंचवटीत घेतली.महाराजांनी साधना सुरु करण्यापूर्वी पंच्वातीमध्ये रामदर्शन करावे असे त्यांना  वाटले म्हणून ते काळाराम मंदिराजवळ येऊन थांबले.त्यावेळी दुपारी कमीत कमी बारा नंतर पुजारी लगबगीन जाण्याच्या तयारीत असलेला,अशावेळी २०-२२ वर्षाचे महाराज दारात येऊन उभे राहिले होते.

तरीही त्या पुजार्याने महाराजांकडे लक्षही दिले नाही,आता नेहमीसारखे पुजारी हा दार बंद करणार होता तेवढ्यात महाराजांनी त्यांचा एक पाय हा दरवाज्यामध्ये ठेवला आणि काय आश्चर्य झाले तर  महाराजांचा पाय मंदिरात पडताच मंदिरामधील सर्व घंटा या जोर जोरात वाजू लागल्या.हा सर्व प्रकार बघून त्या घंटांचा आवाज ऐकून तो पुजारी थक्क झाला आणि त्यांच्या कडे पाहताच राहाला.

महाराजांच्या तेजोवलय त्यांच्या व्यक्तिमत्व भोवती गरगरू लागले फिरू लागले आणि हे सर्व दृश्य पुजारी भावूक होऊन आश्चर्याने बगतच राहिला होता त्यांना त्यांच्या जागून हलतच येईना.महाराजांनी ते द्वार ओलांडून आत आले आणि रामांच्या चरणी स्पर्श करून नतमस्तक झाले आणि त्यांनी नतमस्तक होताच रामाची चरणावरची फुले हि भरभरून महाराजांच्या मस्तकावरून येऊन पडली.

स्वागत केले निजभक्ताचे करुनी घंटानाद | भक्त लाडका भेटी आला | हर्शनी फुले चरनवरती देती आशीर्वाद |

रामाला दंडवत घातल्यानंतर गाभाऱ्यातून प्रकाशाचा एक प्रखर आणि तेजस्वी असा झ्योत महाराजांच्या डोळ्याला येऊन भिडला आणि त्यांच्या व्यक्तीमत्वात भिनून गेला.हे सर्व पाहून पुजारी थक्क झाला आणि पहिला महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला आणि त्यांचे पाय धरू  लागला.महाराजांच्या कृपादृष्टीने पुजारी हा पावन झाला.

शेगावामध्ये आजही रामनवमी खूप मोठ्या उत्साहाने केली जाते.बोला  गण गण गणात बोते |

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *