Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

बायकोला शिकवलं नोकरीला लावलं आणि बायकोच्या हाती बक्कळ पैसा आला अन् तिने नवऱ्यासोबत जे केले ते पाहून..

नमस्कार मित्रांनो,

बहुतेक सगळेच बाप नेहमीच आ-रोपीच्या पिं’जर्‍यात उभे केलेले असतात आणि त्यांच्यावर विविध क’लमांखाली आ रो प ठेवलेले असतात. घरोघरचे आ-रोप बहुतेक त्याच त्या स्वरुपाचे असतात आणि बहुतेक बापांना हे समजतच नाही की आपण तर अनेक गोष्टी ज्यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी करताना आयुष्यभर स्वत:लाच शिक्षा देत आलो त्यांनीच का बरं आपल्यावर आ रो प पत्र ठेवावं आणि वाढलेल्या वयात, मानसिक ताण सहन होत नसतानाही त्या आरोपांसाठी होणार्‍या उलट तपासणीला सामोरं जावं.

तुम्ही आमच्यासाठी फार काय केलं? हा एक सर्वसाधारण आ-रोप असतो आणि तो सगळ्याच बापांच्या विरुध्द केला जातो. काय केलं याची यादी जर एखादा बाप चुकून द्यायला लागलाच तर, त्यात वेगळं काय केलंत असं टोकलं जातं आणि सगळी सफाई देण्यापूर्वीच संपवलेली असते. तुम्ही आम्हाला प्रोत्साहनच दिलं नाही असा आणखी एक आ रो प असतो. प्रोत्साहन द्यायचं म्हणजे काय करायचं?

मुलाने जसे गुण काढले असेल त्यानुसार त्याने आपलं करीयर निवडलेलं असतं. अगदी इंजीनियर जरी झाला तरी मुलगा असा आ रो प लावतो. त्यावेळी विचारच करत नाही की बापाने इंजीनियरिंगची फी भरताना किती ओढाताण करुन घेतली होती. तुम्हाला दूरदृष्टीच नाही. ज्यावेळी घरं स्वस्त होती तेंव्हा चार खोल्या आणि कार पार्कींग असलेला ब्लॉक घ्यायला काय हरकत होती अशा प्रकारचा आणखी एक आ रो प असतो. तीन खोल्या घेताना मार्जिन मनी भरण्यासाठी बापाने काढलेलं कर्ज फेडण्यासाठी आणखी एक पार्टटाईम नोकरी केलेली असते हे मुलगाही विसरतो आणि त्याची आई पण.

माझा एक मित्र आहे. वकीली करतो. वकीली ठीक सुरु आहे. त्याने लग्न केलं त्यावेळी त्याची बायको बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला नापास झाली होती. आपल्याला कुठे बायकोला नोकरीला लावायचंय असं म्हणत त्याने ती पसंत केली. दिसायला चार्चौघींसारखी होती. त्याने लग्नानंतर तिची इच्छा नसतानाही, तिला बी.कॉम. करायला प्रोत्साहन दिलं. पढे ती एम कॉमही झाली. नंतर ती एका कॉलेजला प्राध्यापक झाली. तिला भरपूर पगार मिळायला लागला.

लग्नानंतर वीस वर्षांनी तिला जाणवायला लागलं की आपण एक वकील पसंत केला ही चूकच झाली. याच्यापेक्षा चांगलं स्थळ शोधायला हवं होतं. याचं कारण आता तिचं क्षितीज रुंदावलं होतं, हाती भरपूर पगार येत होता. ती हा विचार मात्र करत नाही की तिला शिकायला नवर्‍यानेच प्रवृत्त केलं, मदत केली, नोकरी मिळवण्यासाठी ओळखीचा वापर केला. आता तिलाच आपला नवरा आपल्याला मॅच नाही असं वाटायला लागलं. अजूनही दोघे एकत्रच आहेत आणि संसारही सुरु आहे.

पण तिने कुठे तरी कुणाकडे तरी चुकून बोललेलं याच्या कानावर आल्यामुळे मात्र हा आतल्या आत खचून मात्र गेला आहे. मुलगा ज्यावेळी बापावर आ-रोपपत्र ठेवतो त्यावेळी अनेक वेळा मुलाची आई आणि बापाची सहचारिणी बापाविरोधात साक्षिदार बनलेली पाहायला मिळते.  तो काय चुकीचं बोलतो आहे? हे एक वाक्य बापाच्या आयुष्यावर ’नापास’ किंवा ’पराभूत’ असा शिक्का मा-रायला पुरेसा असतं.

माझ्या एका मित्राच्या मुलीने मुलगा पाहिला आणि मला याच्याशीच लग्न करायचंय असा हट्ट केला. बापाने सांगून पाहिलं, पण मुलगी हट्टाला पेटली आहे, आणखी विरोध केला तर विचित्र काही करेल असं वाटून परवानगी दिली. त्या मुलाला राहायला घर नसल्याने बापाने आपला एक ब्लॉक त्याला दिला, संसार उभा करुन दिला. पुढे पाच वर्षात त्या दोघांचं बिनसलं आणि त्याची परिणती घ-ट स्फो-टात झाली. मुलगी घरी आली. बाप आतल्या आत रडत होता.

त्यावेळी मुलगी त्याला जाब विचारत होती,  मला एक कळत नव्हतं, तुम्ही तर कडाडून विरोध करायचा होतात ना. तुम्ही मा र लाडे लाडे जावई म्हणून त्याच्या नावावर घर करुन दिलंत. तुम्ही जर विरोध केला असतात तर माझं लग्न त्या विचित्र स्वभावाच्या मुलाशी झालं नसतं आणि आज ही वेळ आली नसती. तो मित्र एक दिवस एका हॉटेलमधे आम्ही बसलो असताना, एक पेग झाल्यावर ओक्साबोक्सी रडायला लागला होता. आपलं काय चुकलं हेच त्याला समजत नव्हतं. त्याला त्याच्या बायकोनेही मुलीची री ओढली होती याचं दु:ख अधिकच होत होतं.

तुम्ही हे करायला हवं होतं, ते करायला नको होतं अशा अनेक गोष्टींचे अध्याय रोजच वाचले जातात. विशेषत: बाप निवृत्त झाल्यावर आणि मुलगा कमवायला लागल्यावर अशा आ-रोपांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढतीच असते. अनेकांना समजत नाही की खरंच आपण इतके कसे मूर्ख बनलो. जे आपलं कर्तव्य आहे असं समजत होतो आणि जे करण्यासाठी आपण आपल्यावरच अन्याय करत होतो ते आपले गु न्हे कसे बनले.

याचं सगळ्यात महत्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे आता बापावरचं अवलंबित्व संपलेलं असतं. मुलांचं आणि बायकोचंही. आता तिला तिचा मुलगा आधार द्यायला सिध्द झालेला असतो. बापाकडे जरी निवृत्ती वेतन असले, थोडीफार शिल्लक असली तरी जर त्यावाचून कुणाचं अडणार नसेल तर बापाची ही अवस्था ठरलेलीच आहे.

आता बापांनी आपण चुकीच्या लोकांसाठी, चुकीच्या कारणांसाठी आपलं आयुष्य वापरलं आहे असा पश्चात्ताप करायचा नाही. हाल सोसताना, कष्ट करताना, त्याग करताना आपल्याला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळत होता ना, तो आठवायचा. जग राहाटी अशीच असणार आहे. प्रत्येक बापाला आ-रोपीच्या पिंजर्‍यात उभं रायायला लागणारच आहे. आता असे आ-रोप झाले तर लगेच कबुली जबाब द्यायचा आणि वाद टाळायचा. ज्यांच्यासाठी त्याग केला, कष्ट सोसले त्यांच्याशी वाद घालायचे प्रसंग टाळणे तर हाती आहे नां. एका त्रयस्थ भूमिकेतून या आ-रोपांकडे पाहायचं आणि बोध घेत पुढचं आयुष्य आपल्याच धुंदीत व्यतीत करायचं. हाच शहाणपणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *