Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

बाळूमामांचा फोटो घरात असेल तर…एकदा हा लेख पहाच..

नमस्कार मित्रांनो,

बाळूमामाच्या नावानं चांगभलं गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव , श्री संत बाळूमामा यांची महती काय सांगावी ! त्यांचा महिमा अगाध. त्यांचा भक्तांशी मोठा जिव्हाळा व जे दुर्गुण व दुराचारी आहेत त्यांना योग्य व कडक शिक्षा ते देतात. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेठजी यांचेकडे चाकरीला ठेवले. शेठजी कुटूंबीयांकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होवून, बहीण गंगुबाई हि-याप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले.

त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेंव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले.उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून दोन साधुना तृप्त केले. साधुनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामांच्या इच्छेविरूद्ध पण आई-वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगुबाईची मुलगी सत्यव्वा बरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता संसार सुरू झाला.

किर्ती किंवा प्रसिद्धीसाठी त्याना हाव, अपेक्षा नव्हती. भक्तांच्या भल्यासाठी, कल्याण्यासाठी प्रसंगानुसार त्यानी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामिण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, निती, धर्माचरणाचा उपदेश करीत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत.

जासूद बाईंचा भाऊ उत्तमचंद शहा त्यावेळी पुण्यात होते. त्यांनी आपल्या बहिणीकडून बाळूमामाचा एक फोटो पूजेसाठी नेलेला होता. भिंती मधील एका कपाटात त्यांनी तो पुजला. त्या कपटाला चांगल दरवाजा देखील नव्हता. एक खिळा ठोकून फोटो त्यात अडकवलेला होता. फोटोची यथासांग पूजा करून उत्तमचंद आपल्या कामावर निघून गेले. यावेळी जासूद बाईची आई मावशी आणि चुलती यांनी तो फोटो पाहिला.

फोटोला पाहून त्या म्हणाल्या आमच्या समाजाच्या देव-देवता म्हणजे पद्मावती पार्श्वनाथ आदिनाथ वगैरेंना सोडून जासूद बाई अशा धनगराच्या काय म्हणून नादी लागली. शिवाय त्यांनी मामाची बरीच टिंगल-टवाळी केली. त्याचक्षणी तिथे त्यांना विलक्षण अनुभव आला. कपाटात अडकवलेला फोटो त्या तिघींच्या समोर येऊन पडला.

त्या फोटोच्या काचेचे तुकडे तुकडे झाले. त्या तिघींना नवल वाटलं. त्या आपापल्या कर्माला घाबरल्या. त्यांना घामच फुटला. इकडे अकोळ मध्ये जासूद बाईंना स्वप्नात मामांचा संदेश आला. स्वप्नात येऊन मामा म्हणाले अगं गुजरे, तुझी माझ्यावर श्रद्धा आहे म्हणून फोटो ठेवला तू पण माझा फोटो तू ज्या कोणाला दिल्यास ते माझी निंदानालस्ती करत आहेत. माझा फोटो मागून घे.

अगं मी तुझा देव आहे त्या लोकांचा नाही. लगेच जासूद बहिणीने भावाला पत्र लिहिलं त्यात त्यांनी मामांची निंदा कोणी केली काय? ते विचारून आपल्याला मामांचा तसा दृष्टांत झाला आहे हे कळविले. तुम्हाला मामांचा फोटो नको असेल तर माझा मला परत करा असं स्पष्ट लिहिलं.

पत्र उत्तमचंद शहांनी वाचलं घरातील सर्वांना मामांच्या फोटोसमोर बोलावून घेऊन उभं केलं. नाक घासून मामांची माफी मागायला लावली. उत्तम काच बसून आणली. त्या फोटोची भावभक्तीने पूजाही केली. मामांची तस्विर आपल्या नेहमीच्या देव्हार्‍यात कायमची स्थापन केली.

जगाच्या कल्याणाची सदैव चिंता वाहणारे आणि स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थ काहीच नसणारे असे सत्पुरुष कोठेही असोत माणसाने त्यांची जात धर्म वय लिं ग आणि समानता वगैरे विचारात कधीच घ्यायची नसते. कारण ते चालते बोलते देवच असतात आपण मात्र त्यांना ओळखण्यात चूक करतो.