नमस्कार मित्रांनो,
हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी आहे. या वर्षी 10 जुलै रविवारच्या दिवशी आलेली आहे. याच दिवशी भगवान श्री हरी विष्णू क्षीर सागरामध्ये शेष नागावर योग निद्रेस्त होतात. तब्बल 4 महिने त्यांची ही योग निद्रा चालते आणि या 4 महिन्यास चातुर मास असे म्हंटलं जातं.
या चातुर मासाच्या काळात या सृष्टीचे संचालन शिव शंकर चालवतात. 4 महिन्यानंतर म्हणजे कार्तिकी एकादशीला श्री हरी विष्णू पुन्हा एकदा त्यांच्या योग निद्रेतून बाहेर येतात. तो दिवस म्हणजे देवगुटणी एकादशी असतो. म्हणून आपण कोणती एकादशी धरा किंवा न धरा पण देवशयनी एकादशीचे व्रत आपण आवर्जून करा.
आज आपण पहाणार आहोत देवशयनी एकादशीला अशी कोणती कामे आहेत जी आपण चुकूनही करू नयेत. पाहिलं काम जी व्यक्ती एकादशीचा उपवास करते पूजा करते मात्र एकाद्या व्यक्तीच मन दुखावते त्या व्यक्तीला त्या पूजा पाठच व व्रताचे संपूर्ण फळ कदापि प्राप्त होत नाही.
कारण प्रत्येक माणसाच्या हृदयात भगवंत वास करत असतात आणि म्हणून आपल्या तोंडून कोणाचा ही अपमान होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घ्या. दुसरं काम या दिवशी देवपूजा करतात किंवा विठू माऊलीची पूजा करताना निळे आणि काळे कपडे वर्ज करा. अनेकजण म्हणतात की विठू माऊली सुद्धा सावळ्या रंगाचे आहेत मात्र जे धर्म शास्त्रात सांगितलं आहे ते तंतोतंत आपण पाहत आहे.
या दिवशी खोट बोलू नये किंवा कोणत्याही झाडाच्या फांद्या तोडू नयेत. तिसरं काम या आषाढी एकादशीस कोणत्याही प्रकारचे तामसिक पदार्थ आपण चुकूनही ग्रहण करू नका. यात मावसांहर तर आलाच मात्र कांदा, लहसून, मसालेदार पदार्थ असेल तसेच दा रू, सि-गारेट असेल या पासून आपण दूर रहा.
हिंदू धर्म शास्त्र अस मानत की तामसिक पदार्थ आपली एकाग्रता भंग करतात. आणि आपले मन एकाग्र नसल्यामुळे आपण भगवंतांचे नामस्मरण एक चित्तात करू शकत नाही. या दिवशी कोणावर ही क्रोध करू नका. शांत रहा संयमी वर्तन आपण या दिवशी ठेवायला हवं तरच आपल्याला या पूजेच संपूर्ण फळ प्राप्त होईल.
तसेच या दिवशी पलंगावर किंवा गादीवर झोपू नये. जमिनीवर एखाद वस्त्र अंथरुण आपण झोपावं. त्याचप्रमाणे या दिवशी तांदळाचे सेवन करून नका किंवा तांदळापासून बनलेल्या वस्तू असतात त्यांच ही सेवन करण्यास धर्म शस्त्राने मनाई केली आहे. या दिवशी तुळशीचे अनेक उपाय आपण करणार असाल.
तर लक्षात ठेवा तुळस ही विष्णू प्रिय आहे भंगवंताना ती अतिशय प्रिय आहे मात्र एकादशीला तुळशीला स्पर्श करणं किंवा तुळशीची पाने तोडणं यामुळे मोठे दोष आपल्या माथी लागतात आणि जीवनात अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा निर्माण होतात. तर ही चूक आपण कधीही करू नका.
एक लक्षात ठेवा जेंव्हा आपण श्री हरी विष्णूंना नैवेद्य अर्पण कराल तेंव्हा त्या नैवेद्यावर तुळशीची 2 पाने ठेवायला विसरू नका त्याशिवाय श्री हरी विष्णू ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत. ही पाने एकादशीच्या पहिल्या दिवशी तोडावीत. या आषाढी एकादशीस या काही नियमांचे पालन करून जर आपण भगवंतांच्या चरणी तल्लीन झालात. तर भगवंतांच्या कृपेने या जगात कोणतीही गोष्ट अशी नाही जी आपणास अशक्य आहे..