नमस्कार मित्रांनो,
31 ऑगस्ट 2022 बुधवार चा दिवस आणि या दिवशी श्री गणेश चतुर्थी आलेली आहे. अनेक लोक गणपती बाप्पांना आपल्या घरात विराजमान करतात. बाजारातून गणेश मूर्ती खरेदी केल्या जातात आणि गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करून पूजा केली जाते. आशा वेळी हिंदू धर्म शास्त्राने 5 प्रकारच्या गणेश मूर्ती खरेदी करण्यास आणि त्यांची आपल्या घरात स्थापना करण्यास मनाई केलेली आहे.
कारण या 5 गणेश मूर्तींची स्थापना आपल्या घरामध्ये केल्यास घरात दुःख, दारिद्र्य, संकटे आणि अनिष्ट कारक गोष्टी उत्पन्न होतात. जाणून घेऊ या कोणत्या 5 गणेश मूर्ती आहेत ज्या आपण चुकूनही खरेदी करू नयेत. यातील पहिली गणेश मूर्ती म्हणजे मुकुटाविना असलेली गणेश मूर्ती म्हणजे गणपती बाप्पांची अशी मूर्ती की त्यांच्या डोक्यावर मुकुट नाही.
मुकुट हा मानाचा प्रतीक आहे. आणि अशी मुकुटा शिवाय असलेली गणेश मूर्ती जर आपण पूजा करत असेल तर गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला मिळणार नाहीत. आणि म्हणून आशा प्रकारची मूर्ती आपण खरेदी करू नये. दुसरी मूर्ती आहे उभी असलेली गणेश मूर्ती पाहायला गेलं तर बाजारात अनेक प्रकारच्या गणेश मूर्ती पाहायला मिळतील मात्र ज्या मूर्ती मध्ये गणपती बाप्पा उभे आहेत अशी गणेश मूर्ती मात्र आपण खरेदी करू नका.
कारण गणपती बाप्पांना इतक्या दिवस ताटकळत उभं ठेवण हिंदू धर्म शास्त्राने वर्ज मानलेलं आहे. तिसरी मूर्ती जी आपण कदापी खरेदी करू नये ती म्हणजे शिव परिवारासहित असलेली गणेश मूर्ती अनेकजण शिव परिवारासहित असलेली गणेश मूर्ती खरेदी करतात आणि गणेश चतुर्थी निमित्ताने त्या मूर्तीची पूजा केली जाते. मात्र यामुळे महादेवांची, माता पार्वती किंवा कार्तिकेय, अशोक सुंदरी यांची रोज पूजा केली जात नाही किंवा त्यांच्या पूजेचे नियम पाळले जात नाहीत.
मग या देवतांचा क्रोध निर्माण होऊ शकतो आणि याचा वाईट परिणाम आपल्यावर व आपल्या परिवारावर होऊ शकतो. म्हणून केवळ गणपती बाप्पांची मूर्ती आपण खरेदी करा. चौथी मूर्ती गरुडावर विराजमान असलेली गणेश मूर्ती गरुड हे गणपती बाप्पांचे वाहन मानले जात नाही. तर आशा प्रकारे गरुडावर विराजमान असलेली मूर्ती आपल्या घरात कदापी आणू नका.
कारण यामुळे घरामध्ये गरिबी, दारिद्र्य या गोष्टी निर्माण होऊ शकतात आणि घरामध्ये वायफाय गोष्टीसाठी पैसा खर्च होऊ लागतो. आणि याला धार्मिक मान्यता सुद्धा आहे की अशी मूर्ती मंदिरामध्ये शोभते कारण त्याठिकाणी अनेक नियमांचे पालन केले जाते. यामुळे अशी मूर्ती घरात कदापी आणू नका.
पाचवी मूर्ती आहे मूषक नसलेली गणेश मूर्ती मूषक हे गणपती बाप्पांचे वाहन आहे. गणेश पुराणात असे सांगितले आहे की गणपती बाप्पा ज्या-ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपल्या वाहनाशिवाय जात नाहीत. आणि जर आपण जी गणेश मूर्ती आपल्या घरी आणतो त्या ठिकाणी मूषक नसेल तर असे गणपती बाप्पा आपल्या घरी येतील तर कसे आणि म्हणून आपण मूषक नसलेली गणेश मूर्ती कदापी खरेदी करू नका.
तर हिंदू धर्म शास्त्रात संगीतलेल्या या काही नियमांचे पालन आपण नक्की करा. गणपती बाप्पांची असीम कृपा या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर नक्की होईल.