नमस्कार मित्रांनो,
अक्षय तृतीया वर्षभरात जे साडेतीन शुभ मुहूर्त येतात त्या पैकी एक मुहूर्त आहे. याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता. भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची जयंती सुद्धा याच दिवशी साजरी केली जाते. या दिवशी उपवास केला जातो स्नान दान केलं जातं आणि यातून मिळणार पुण्य हे अक्षय टिकत अशी मान्यता आहे.
सोबतच अक्षय तृतीया दिवशी अनेक लोक सोन्याची खरेदी करतात. कारण या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे अक्षय टिकत त्याच्या किमतीत वाढ होत जाते. आणि सोनं खरेदी करणाऱ्याला लाभ आणि लाभच प्राप्त होतो अशी प्राचीन मान्यता आहे. मात्र प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य होणार नाही.
आणि आशा वेळी आपल्याला हे सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर सोन्याऐवजी सोन्या इतकी मौल्यवान दुसरी वस्तू खरेदी करू शकता. यावर्षी म्हणजेच 2022 या वर्ष्यात 3 मे मंगळवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे. या दिवशी आपण सोन्याऐवजी माता लक्ष्मीची पावले खरेदी आवश्य करा.
या लक्ष्मी पादुका वेगवेगळ्या धातुमध्ये तुम्हाला मिळून जातील. जसे. तांबे, चांदी, सोनं, पितळ आहे. खर तर लक्षात ठेवा आपण एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन त्या ठिकाणांहून या लक्ष्मी पादुका खरेदी करा. या अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर या लक्ष्मी पादुकाची स्थापना आपल्या देवघरात करा.
आणि या दिवसापासून रोज या लक्ष्मी पादुकाची विधिवत पूजा करण्यास प्रारंभ करा.आता लक्ष्मी पादुका खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कोणता तर सोने खरेदीचा जो शुभ मुहूर्त असतो त्याच शुभ मुहूर्तावर आपण लक्ष्मी पादुकाची खरेदी करा.
सोने खरेदीचा शुभ मुहूर्त हा अक्षय तृतीयाच्या पहाटे 5:39 मिनटापासून ते दुसऱ्या दिवशी बुधवारी सांयकाळी 5:38 मिनिटापर्यंत हा मुहूर्त असणार आहे. जेव्हा माता लक्ष्मीच्या पादुका आपल्या घरात येतील त्या पादुकासोबत लक्ष्मीची पावले सुद्धा आपल्या घराकडे ओळतील आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात धन, धान्य, ऐश्वर्य, संपत्ती, वैभव, पैसा या गोष्टींची कधीच कमतरता पडणार नाही.