नमस्कार मित्रांनो,
आपल्या स्वयंपाक घरातील एक अत्यंत महत्वाची वस्तू म्हणजे तवा आहे. वास्तू शास्त्रानुसार या तव्याचा संबंध राहू ग्रहा शी आहे. आणि म्हणूनच तवा अयोग्य दिशेला ठेवलेला असेल व अयोग्य पध्दतीने ठेवलेला असेल तर त्यामुळे राहू दोष निर्माण होतो आणि घरात गरिबी, कंगाली येऊ लागते.
प्राचीन परंपरा असं सांगते की स्वयंपाक केल्यानंतर गरम असणारा तवा हा ताबडतोब खरकट्या भांड्यात किंवा पाण्यामध्ये ठेऊ नये. तसेच गरम तव्यावर पाणी शिंपडू नये जेंव्हा आपण गरम तव्यावर पाणी शिंपडतो त्यातून जो छन प्रकारचा आवाज निर्माण होतो तो आवाज अत्यंत अशुभ मान्यात आलेला आहे.
या आवाजातून आपल्या घरात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक शक्ती पसरते. जेंव्हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू होतो तेंव्हा त्या व्यक्तीच्या तेराव्याला आपण गरम तव्यावर पाणी शिंपडतो ही प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणून जर अशी प्रथा स्वयंपाक घरात नित्य नेमाने होत असेल तर त्यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही.
आणखीन एक गोष्ट जोतिष शस्त्राने या तव्याचा सं-बंध राहु शी मानला आहे. आणि म्हणूनच तव्याची रोजच्या रोज सफाई करणं हे फार महत्वाच आहे. तवा कधीच स्वयंपाक घरात खरकटा ठेऊ नये. सोबतच या तव्यावर घराबाहेरील लोकांची नजर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
तवा आशा ठिकाणी ठेवावा की तो तवा झाकून राहील. अनेक लोक तवा लटकावून ठेवतात किंवा उभा ठेवतात ही सुद्धा अत्यंत चुकुची पध्दत आहे. तवा हा नेहमी सरळ ठेवावा. असं मानलं जातं की ज्या घरात तवा उभा करून ठेवला जातो त्या घरात सतत वादविवाद होतात व घरात अशांती पसरते.
तवा कधीच गॅस किंवा चुलीवर रिकामा ठेऊ नये तव्याच काम झाल्याबरोबर गॅस वरून किंवा चुलीवरून खाली उतरवायलाच हवं. तव्यावर भाकरी किंवा चपाती करण्यापूर्वी आपण चिमूटभर मीठ या तव्यावर नक्की टाका. आणि त्या मिठाचा तडतड असा आवाज येऊ द्या. असं केल्याने घरातून नकारात्मकता निघून जाते.
आपल्या घरात जर धन धान्यात बरकत हवी असेल पैसा कधीच कमी पडू नये असे वाटत असेल तर हा एक छोटासा उपाय घरातील गृहिणीने अगदी आवर्जून करा. वैज्ञानिक तथ्य असं आहे की तव्यावर जेंव्हा मीठ टाकतो आणि त्यातून जो आवाज बाहेर पडतो त्यातून त्या तव्याची स्वच्छता होते आणि त्या तव्यावरचे बॅक्टेरिया हे नष्ट होतात. अशा तव्यावर केलेल्या भाकरी, चपाती करून हे अन्न खाल्ल्याने यातून व्यक्ती आजारी पडत नाही.