आपण सगळेच सकाळ, संध्याकाळ देवघरात बसून देवाची पूजा,अर्चना,सेवा करतो परंतु आपण सकाळची पूजा करतो सकाळची सेवा करतो ती थोडी विशेष असते कारण आपण त्या वेळेस देवघराचे साफ सफाई करतो देवाला स्नान घालतो एक भांड्यामध्ये पाणी घेवून त्यामध्ये सगळे देव ठेवून देवांना स्नान घालतो
आणि देवांना व्यवस्थित साफ करून पुसून पुन्हा त्यांच्या स्थानी आपण देवांना स्थापन करतो. परंतु इथे प्रश्न पडतो की मग ते स्नान झालेले पाणी करायचे काय बरेच लोक ते पाणी चुकून आश्या जागेवर टाकतात की जिथे टाकायला नाही पाहिजे आणि सगळ्यात मोठी चूक त्यांच्या कडून होत असते. अशा काहीतरी जागा आहेत जिथे ते पाणी आपण चुकूनसुद्धा टाकायला नाही पाहीजे.
तर पहिली म्हणजे बरेच लोक देवांचे स्नान घालून ते पाणी तुळशी मध्ये टाकतात तर हे सगळ्यात मोठी चूक आहे तुळशी ही शुभता आणि शुद्धतेची प्रतीक आहे ते पाणी चुकून सुद्धा तुळशी मध्ये टाकायला नाही पाहिजे तुम्ही जर टाकत असाल तर ते लगेच बंद करा तुळशी मध्ये अजिबात ते पाणी टाकू नका.
दुसरी जागा देवांचे स्नान घातल्यावर ते पाणी तुम्ही घराच्या मुख्य दाराच्या बाहेर अगदी बाहेर अजिबात टाकायच नाही किंवा त्या पाण्याचा सडा सुद्धा टाकायच नाही किंवा आजूबाजूला सुद्धा ते पाणी टाकायकचे नाही कारण त्यावर कोणाचा पाय पडू शकतो म्हणून ते पाणी घराच्या बाहेर जाऊन कुठेही आश्या जागेवर टाकू नका की जिथे कोणाचे पाय पडतील तर अजिबात टाकू नका.
मग आता प्रश्न पडतो की ते पाणी टाकायचे कुठे तर ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकावे तुळशीचे झाड सोडून कोणते फुलांचे झाड, आंब्याचे झाड, गुलाबाचे कोणतेही झाड असुद्या त्या झाडांना तुम्ही ते पाणी टाकू शकता किंवा आश्या ठिकाणी टाका जिथे कोणाचा पाय पडणार नाही मग तो माणूस असेल मग प्राणी असेल कोणाचाही पाय त्या पाण्यावर पडायला नाही पाहिजे अशा ठिकाणी ते पाणी तुम्ही टाकू शकता.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे मराठी आस्था फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.